नायलॉन मांजामुळे जीविताला धोका; दबंग ठाणेदार भरत लसंते यांचा विक्रेत्यांना थेट इशारा

Digital India
0


वाशिम जिल्हा प्रतिनिधी


(कारंजा लाड)धनज बु. परिसरात नायलॉन मांजामुळे नागरिकांच्या जीविताला गंभीर धोका निर्माण झाला असून अपघातांच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ होत आहे. दुचाकीस्वार, पादचारी, लहान मुले तसेच निरपराध पक्षी नायलॉन मांजाचे बळी ठरत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

या पार्श्वभूमीवर धनज बुद्रुक पोलीस स्टेशनचे दबंग ठाणेदार भरत लसंते यांनी नायलॉन मांजाची विक्री, साठवणूक व वापर करणाऱ्या विक्रेत्यांना थेट व स्पष्ट इशारा दिला आहे. नायलॉन मांजा हा कायद्याने पूर्णतः प्रतिबंधित असून, त्याचा वापर अथवा विक्री करणाऱ्यांवर कोणतीही दयामाया न दाखवता थेट गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.

ठाणेदार भरत लसंते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने धनज बुद्रुक परिसरात विशेष तपास मोहीम सुरू केली असून, अवैध नायलॉन मांजा विक्री करणाऱ्यांवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे.

“नागरिकांचे प्राण धोक्यात घालणाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत माफ केले जाणार नाही. नायलॉन मांजामुळे जर कुणाचे जीवित धोक्यात आले, तर त्यास संबंधित विक्रेतेच जबाबदार धरले जातील,” असा कडक इशाराही त्यांनी दिला.

पोलीस प्रशासनाच्या या आक्रमक भूमिकेमुळे नायलॉन मांजा विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली असून, कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी धनज बुद्रुक पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. नागरिकांनी नायलॉन मांजाचा वापर टाळावा तसेच कुठेही अवैध विक्री आढळून आल्यास तात्काळ पोलीस प्रशासनाला माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

या कठोर कारवाईमुळे धनज बुद्रुक परिसर नायलॉन मांजा मुक्त होईल, अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे.


Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

Made with Love by

Digital India News
Connecting India To New World Of Digital Energy
To Top