दर्पण रत्न पुरस्कार 2026 निमित्ताने आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृतीला उजाळा

Digital India
0

 

हिंदी मराठी पत्रकार संघाकडून मलकापूर येथे लेखणीच्या योद्धयांचा यथोचित सन्मान


पत्रकारितेचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून ६ जानेवारी २०२६ रोजी मलकापूर येथे" राज्यस्तरीय दर्पण रत्न पुरस्कार 2026" हा भव्य सोहळा अत्यंत दिमाखात संपन्न झाला. हिंदी मराठी पत्रकार संघाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात पत्रकारिता क्षेत्रात अहोरात्र  झटणाऱ्या निधड्या छातीच्या पत्रकारांना सन्मानित करण्यात आले.   मलकापूर येथे मराठा मंगल  सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

सदर कार्यक्रमात महाराष्ट्राचे कानाकोपऱ्यातील आलेल्या विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वांचा सत्कार करण्यात आला .आंतरराष्ट्रीय मानांकन आयएसओ 9001_2015 प्रमाणित हिंदी मराठी पत्रकार संघ च्या वतीने विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तींचा गौरव करण्याच्या उद्देशाने व त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी दर्पण रत्न पुरस्कार 2026 चे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रस्ताव ऑनलाइन मागवण्यात आले होते

त्यावेळी 980 प्रस्तावांपैकी निवड करून 240 मान्यवरांना दर्पण रत्न पुरस्कार 2026 प्रदान करण्यात आला.  दर्पण रत्न पुरस्कार वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निलेश तायडे सहा. माहिती आयुक्त मंत्रालय मुंबई  कार्यक्रमाचे उद्घाटकडॉ. प्रा. अनिल खर्चे (प्राचार्य व्ही. बी. कोलते इंजीनियरिंग कॉलेज) ,   तर प्रमुख पाहुणे  अशांत भाई वानखेडे संस्थापक समतेचे निळे वादळ , धनश्रीताई काटीकर पाटील महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हिंदी मराठी पत्रकार संघ, बंडूभाऊ चवरे उद्योजक, बाळासाहेब दामोदर उद्योजक , दामोदर शर्मा शेतकरी नेते, विजय डागा, बंडू चौधरी, सुभेदार दिनेश तायडे कारगिल योद्धा, चंद्रकांत वर्मा, हे होते. कार्यक्रमाची सुरुवात आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर व प्रथम महिला संपादक तानुबाई बिरजे यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली.

कार्यक्रमात पत्रकारिता, शिक्षण, सामाजिक ,राजकीय ,कला, वैद्यकीय, उद्योजक, क्रीडा अशा अनेक क्षेत्रातील कर्तुत्वान व्यक्तींचा सत्कार दर्पण रत्न पुरस्कार 2026 देऊन करण्यात आला. या कार्यक्रमाप्रसंगी देशासाठी आपल्या प्राणाची परवा न करता देशसेवा करणाऱ्या तसेच कारगिल युद्धात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या सुभेदार दिनेश तायडे माजी सैनिकांचा स्मृतिचिन्ह यांचा सत्कार करण्यात आला. 

  यावेळी पत्रकारांना मार्गदर्शन करताना धनश्री ताई काटीकर पाटील यांनी  पत्रकारितेचे समाजातील स्थान अधोरेखित केले पत्रकार लोकशाहीचा भक्कम आधारस्तंभ आहे संकटाच्या काळातही आपली लेखणी जिवंत ठेवून समाजाला न्याय देण्याचे काम पत्रकार करतात असे शब्दांत त्यांनी पत्रकारांचे कौतुक केले . त्यांचे शुभहस्ते पत्रकरिता क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारा पत्रकारांना सन्मानित करून त्यांना प्रोत्साहित करण्यात आले.      पत्रकारितेच्या माध्यमातून समाजातील अन्यायाला वाचा फोडणाऱ्या आणि जनहित जपणाऱ्या पत्रकारांना यावेळी गौरविण्यात आले.समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या निष्ठेचा आणि परिश्रमाचाही यावेळी सन्मान करण्यात आला. 

 कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांचे आभार मानताना एक वेगळीच ऊर्जा पाहायला मिळाली . पत्रकार हे समाजाचा कणा आहे, आणि त्याच्या सन्मानाने लोकशाहीचे मूल्य अधिक घट्ट होतात अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या. 

 मलकापूर परिसरातील या सोहळ्याने केवळ पत्रकारांचा गौरवच नाही तर बदलत्या काळातही लेखणीची ताकद शाबूत असल्याचा संदेश संपूर्ण हिंदी मराठी पत्रकार संघाने दिला . अत्यंत शिस्त , प्रेरणादायी वातावरणात पार पडलेला सोहळा उपस्थित पत्रकारांसाठी एक अविस्मरणीय ठेवा ठरला.

लेखणीचा सन्मान हाच आमचा स्वाभिमान हा संदेश देत आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या विचारांची मशाल तेवत ठेवत प्रेरणादायी कार्यक्रमाची सांगता झाली . एक सुंदर आणि शिस्तबद्ध आयोजन म्हणून या कार्यक्रमाची चर्चा संपूर्ण परिसरात रंगली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कोमल पाटील  यांनी तर आभार प्रदर्शन श्रीकृष्ण तायडे यांनी केले.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अजय टप, सतीश दांडगे, प्रा. प्रकाश थाटे, सुधाकर तायडे, प्रमोद हिवराळे, नथूजी हीवराळे , मयूर लड्डा,  शेख ताहेर , विनायक तळेकर, भाऊराव व्यवहारे , सुनील देशमुख, अमोल वानखेडे, किशोर सोनवणे, विनोद व्यवहारे, श्रीकृष्ण शिरसागर, बिस्मिल्ला पठाण, आत्माराम मोरे, यांनी परिश्रम घेतले

 *राज्यभरातून आलेल्या ज्येष्ठ पत्रकारांना पत्रकारिता जीवन गौरव पुरस्कार* 

आपल्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग पत्रकारितेला अर्पण करणाऱ्या तो गेल्या अनेक वर्षापासून पत्रकारितेत त असलेल्या जेष्ठ पत्रकारांना याप्रसंगी पत्रकारिता जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आले यावेळी श्री दयानंद मांगले सिंधुदुर्ग, नामदेव  पाडवी नाशिक, युवराज बच्छे ४० गाव , मोहन कदम मालाड , शरद  मोरे रत्नागिरी,  संतोष  सातकर पुणे , नेमीनाथ जैन परभणी, मुकुंद  निघोजकर अहिल्यानगर, चंद्रकांत  हगलगुंडे तुळजापूर यांना पत्रकारिता जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

Made with Love by

Digital India News
Connecting India To New World Of Digital Energy
To Top