महाराष्ट्राचं लाडकं नेतृत्व हरपलं; बारामतीतील विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा मृत्यू

Digital India
0

  


बारामती: बारामती इथं झालेल्या विमान अपघातात राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन झालं आहे. विमान लँड होत असताना झालेल्या या अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह इतर तीन जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. याबाबत पीटीआय या वृत्तसंस्थेने माहिती दिली आहे. अजितदादांच्या अपघाती मृत्यूने महाराष्ट्र सुन्न झाला असून सर्वांनाच धक्का बसला आहे. अजित पवार हे आज सकाळी आपल्या काही सहकाऱ्यांसह मुंबईहून बारामतीकडे येत होते. जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अजितदादा हे सभेसाठी बारामतीला येण्यासाठी निघाले होते. मात्र बारामतीत पोहोचल्यानंतर विमान लँड होत असताना ते कोसळले. या अपघातात अजित पवारांसह इतर तीन जणांचा मृत्यू झाला.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

Made with Love by

Digital India News
Connecting India To New World Of Digital Energy
To Top