नागपूर
देशभरात झालेल्या अठराव्या रोजगार मेळाव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात ४५ ठिकाणी दूरदृष्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या विविध भागात नव्याने नियुक्ती झालेल्या कर्मचाऱ्यांना संबोधित केले. रोजगार मेळाव्यात अंतर्गत नागपुरात केंद्रीय राखीव पोलिस दल - सीआरपीएफ ग्रुप सेंटर हिंगणा येथे केंद्रीय राखीव पोलिस दल - सीआरपीएफचे नागपूरचे उपमहापोलिसनिरिक्षक अनिल कुमार यांच्या हस्ते 250 नियुक्ती पत्रांचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी संबोधित करताना अनिल कुमार यांनी नवनियुक्तांना आवाहन केले की ,इमानदारी ,निष्ठा ,कर्तव्य पारायण या गुणांसोबत आपल्याला देशसेवेचे एक प्रहरी बनायचे आहे . देशातील नागरिकांची सुरक्षा, सामाजिक शांती आणि नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करण्याचे मोठे दायित्व या नवनियुक्तांना पार पाडायचे असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले.
निवड झालेले हे नवनियुक्त कर्मचारी सीआरपीएफ, एमएसीएल, सीमा सुरक्षा दल , बँक तसेच केंद्र शासनाच्या विविध विभागात कार्यभार स्वीकारतील .या मेळाव्यात 250 नवनियुक्त यांना नियुक्तीपत्र वितरण करण्यात आले. या कार्यक्रमांमध्ये मिनरल एक्स्प्लोरेशन अँड कन्सल्टन्सी लिमिटेड एमएसीएल चे मानव संसाधन विभागाचे उपमहाव्यवस्थापक राममूर्ती त्याचप्रमाणे बँक ऑफ बडोदाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.याप्रसंगी रोजगार मेळाव्यात नियुक्ती मिळालेले कर्मचारी त्यांचे कुटुंबीयही उपस्थित होते .
