बुध
खरीप हंगामातील अल्प पर्जन्यमानच्या आधारे खटाव तालुक्यात दुष्काळाचा ट्रिगर १ लागू झालेला आहे. खटाव तालुक्यात यंदाच्या खरीप हंगामात सरासरीपेक्षा खूपच कमी पाऊस झाल्याने हाता तोंडाशी आलेली सोयाबीन घेवडा मका ही पिके शेतकऱ्यांच्या डोळ्यादेखत सुकून गेली.सरासरीच्या 70 टक्केच पाऊस झाला आहे .खरीप पिकांचे नुकसान झाल्याने नुकसानग्रस्त क्षेत्राचे पंचनामे करणेबाबत महसूल कृषी व ग्रामविकास विभागाच्या अधिकारी प्रत्यक्ष क्षेत्रावर फिरून पंचनामे करत आहेत. व प्रत्यक्ष नुकसान ग्रस्त क्षेत्राची व पिकाची माहिती घेत आहेत. बुध येथे याच पार्श्वभूमीवर बुधवार दिनांक 30 सप्टेंबर रोजी उपविभागीय कृषी अधिकारी श्री सागर डांगे, तालुका कृषी अधिकारी श्री विक्रम वाघमोडे, मंडळ कृषी अधिकारी कुंडलिक जाधव, उपकृषी अधिकारी संतोष शिंदे सहाय्यक कृषि अधिकारी आकाश काळुखे, ग्राम महसूल अधिकारी विक्रम ढोले व परिसरातील शेतकरी उपस्थित होते. सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे पूर्ण करावेत अशा सूचना यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी यांनी दिल्या तसेच शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रे तत्काळ पंचनामा करणारे टीम कडे जमा करावीत असे आवाहन केले.
