बुध
आगामी नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पुसेगाव पोलीस ठाण्याच्या वतीने नवरात्रोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची मार्गदर्शक बैठक घेण्यात आली. उत्सव काळात शांतता, सामाजिक सलोखा आणि नागरिकांची सुरक्षितता यांना सर्वोच्च प्राधान्य देत प्रशासनाच्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले.
दि. ११ ते २० ऑक्टोबर २०२६ या कालावधीत होणाऱ्या नवरात्रोत्सवाच्या अनुषंगाने पुसेगाव पोलीस ठाण्यात ही बैठक पार पडली. यावेळी दुर्गादेवी मंडळांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्य, पोलीस पाटील, ज्येष्ठ नागरिक तसेच मोहल्ला कमिटी सदस्य उपस्थित होते. बैठकीस सुमारे ६० ते ६५ नवरात्रोत्सव मंडळांचे पदाधिकारी व पोलीस पाटील उपस्थित होते.
बैठकीत आ, डॉल्बी व लाऊडस्पीकरचा वापर शासनाने निश्चित केलेल्या नियम व ध्वनीमर्यादेनुसारच करावा, तसेच आवश्यक त्या परवानग्या घेऊनचध्वनिक्षेपकाचा वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या. दुर्गादेवी स्थापना व विसर्जन मिरवणुका शांततेत आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवून पार पाडण्याचे आवाहन करण्यात आले.
मंडप उभारणीसाठी आवश्यक परवानग्या घेणे बंधनकारक असून, महिला, मुली व ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेची विशेष काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. मिरवणुकीत अश्लील गाणी, आक्षेपार्ह घोषणाबाजी किंवा कोणत्याही समाजाच्या भावना दुखावतील असा मजकूर टाळण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले.तसेच दारू किंवा अमली पदार्थांचे सेवन करून उत्सव अथवा मिरवणुकीत सहभागी होऊ नये, वाहतुकीलाअडथळा निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी आणि गर्दीच्या नियोजनासाठी मंडळांनी स्वयंसेवक नियुक्त करावेत, असे सांगण्यात आले.सोशल मीडियावर अफवा, भडकाऊ किंवा आक्षेपार्ह पोस्ट प्रसारित करू नयेत. कोणताही वाद, अफवा किंवा संशयास्पद प्रकार निदर्शनास आल्यास नागरिकांनी स्वतःहून कारवाई न करता तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले.
दुर्गा दौडीसाठीही पोलिसांची पूर्वपरवानगी आवश्यक दुर्गा दौड आयोजित करण्यापूर्वी पोलीस विभागाची पूर्व परवानगी घेऊन दौडीचा मार्ग, वेळ आणि सहभागींची संख्या याबाबत माहिती देणे आवश्यक असल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले. दौड शांततेत व शिस्तीत पार पाडावी, वाहतुकीला अडथळा होणार नाही याची दक्षता घ्यावी, तसेच आक्षेपार्ह घोषणा, गाणी, नियमबाह्य आ/डॉल्बीचा वापर आणि धोकादायक वाहनचालक टाळण्याच्या सूचना देण्यात आल्या.
नवरात्रोत्सव हा आनंद, भक्ती आणि सामाजिक एकोपा वाढविणारा उत्सव असून, सर्वांनी कायद्याचे पालन करून शांतता, शिस्त आणि सर्वधर्मीय सलोखा राखत उत्सव साजरा करावा, असे आवाहन पुसेगाव पोलिसांकडून करण्यात आले.
