भुईंज/प्रतिनिधी
रयत शिक्षण संस्थेचे आझाद कॉलेज ऑफ एज्युकेशन, सातारा आणि क. भा. पा. विद्यालय, भुईंज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शालेय आंतरवासिता अंतर्गत विद्यालयात विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले.
या विज्ञान प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांनी विविध विज्ञानविषयक प्रतिकृती व प्रयोग तसेच शैक्षणिक साधने व प्रकल्प यांच्याद्वारे वैज्ञानिक प्रतिभा, वैज्ञानिक दृष्टिकोन, निरीक्षणशक्ती, सर्जनशीलता आणि प्रयोगशीलता यांचा उत्कृष्ट अविष्कार उस्फूर्त सहभागाद्वारे सादर केला.
प्रदर्शनाचे उद्घाटन आझाद कॉलेजच्या प्राचार्या व्ही एस नलवडे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्ष म्हणून विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री दीपक ढाणे उपस्थित होते. विद्यालयाच्या विज्ञान विषय शिक्षक प्रा नष्टे मॅडम,गट मार्गदर्शक डॉ एस एस टेळे यांचे विशेष मार्गदर्शन मिळाले. बी. एड. प्रशिक्षणार्थी यांनी विज्ञान त्रिवेणी बने, रूपा दीक्षित, समृद्धी निकम, ललिता भिसे व निकिता धायगुडे यांनी विज्ञान प्रदर्शनाच्या यशस्वी आयोजनाकरिता परिश्रम घेतले.
