ज्ञानदान हेच श्रेष्ठ दान… विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक प्रेरणादायी उपक्रम!

Digital India
0


पारिजात फाउंडेशन आणि भैरी भवानी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व दप्तरांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य फुलले असून त्यांच्या शैक्षणिक प्रवासाला नवी ऊर्जा व प्रेरणा मिळाली.

विद्यार्थ्यांच्या शिक्षणातील अडचणी कमी करून त्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करून देणे, समाजात शिक्षणाबाबत सकारात्मक जाणीव निर्माण करणे आणि प्रत्येक विद्यार्थी शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात टिकून राहावा, या उदात्त हेतूने हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला.

या प्रसंगी श्री. चंद्रकांत जी जावळे साहेब, वीर -देवपाट ग्रामपंचायत सहकारी, वाडी सदस्य, भैरी भवानी प्रतिष्ठान चे पदाधिकारी आणि सर्व शाळा शिक्षक आदी उपस्थित मान्यवर, शिक्षक, पालक, ग्रामस्थ व प्रतिष्ठानच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व दप्तरांचे वितरण करण्यात आले. विद्यार्थ्यांनीही आनंदाने हा उपक्रम स्वीकारत आयोजकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.


समाजातील प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षणाची समान संधी मिळावी, त्याची स्वप्ने साकार व्हावीत आणि उज्ज्वल भविष्य घडावे, हीच या उपक्रमामागील खरी प्रेरणा आहे.

🌿 “एक दप्तर… शिक्षणाची नवी उमेद!
एक हातभार… विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याकडे!”


या स्तुत्य सामाजिक उपक्रमासाठी विशेष सहकार्य हे भैरी भवानी प्रतिष्ठान आणि पारिजात फाउंडेशन यांचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, भविष्यातही अशाच समाजोपयोगी उपक्रमांची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.


आयोजक

पारिजात फाउंडेशन तथा भैरी भवानी प्रतिष्ठान“शिक्षणासाठी केलेली प्रत्येक मदत ही समाजाच्या प्रगतीची भक्कम पायाभरणी असते.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

Made with Love by

Digital India News
Connecting India To New World Of Digital Energy
To Top