परदेशात नोकरीसाठी जाणाऱ्या व्यक्तींसाठी फीव्हर लसीकरण केंद्र नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे सुरु करण्याची मागणी

Digital India
0


पनवेल , ( वार्ताहर ) 


: परदेशात नोकरीसाठी जाणाऱ्या व्यक्तींसाठी फीव्हर लसीकरण केंद्र नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे सुरु करण्याची मागणी ऑल इंडिया सीफेरर्स अँड जनरल वर्कर्स युनियनच्या वतीने युनियनचे अध्यक्ष संजय पवार यांनी नवी मुंबईचे महापौर यांची भेट घेऊन दिलेल्या निवेदनाद्धोरे केली आहे . 

                          या निवेदनात संजय पवार यांनी म्हटले आहे की , नवी मुंबई येथे उभारण्यात उरण्यात आलेते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ अर्थात स्वर्गीय दिनकर बाळू पाटील (दि . बा . पाटील) आंतरराष्ट्रीय विमानतळ हे भविष्यात आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी एक महत्त्वाचे केंद्र बनणार आहे.या विमानतळामूळे मोठ्या प्रमाणात आंतरराष्ट्रीय प्रवासी सीफेरर्स कर्मचारी, विद्यार्थी, व्यावसायिक तसेच परदेशात नोकरीसाठी जाणारे कामगार प्रवास करणार आहेत. अनेक देशांच्या आंतरराष्ट्रीय आरोग्य नियमांनुसार काही देशांमध्ये प्रवास करण्यासाठी यलो फीव्हर लसीकरण अनिवार्य आहे. सध्या नवी मुंबई परिसरात अधिकृत यलो फीव्हर लसीकरण केंद्र उपलब्ध नसल्यामुळे सीफेरर्स तसेच आंतरराष्ट्रीय प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः मर्चट नेव्ही मध्ये कार्यरत असलेल्या हजारो सीफेरर्सना जहाजावर जॉईन होण्यासाठी ही लस अनिवार्य स्वरूपात घ्यावी लागते.नवी मुंबई हे भारतातीत एक महत्वाचे मर्चेंट नेव्ही आणि सागरी व्यवसाय केंद्र बनले आहे. त्यामुळे सार्वजनिक हित लक्षात घेता खालीलपैकी कोणत्याही ठिकाणी अधिकृत यलो फीव्हर लसीकरण केंद्र सुरू करण्यात यावे त्यामध्ये नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ किंवा नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत असलेल्या शासकीय रुग्णालयात या सुविधेमुळे सीफेरर्स व मर्चट नेव्ही कर्मचारी, परदेशात शिक्षणासाठी जाणारे विद्यार्थी, आंतरराष्ट्रीय प्रवासी, परदेशात नोकरीसाठी जाणारे कामगार, व्यावसायिक व पर्यटक यांना मोठा फायदा होणार आहे . 

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

Made with Love by

Digital India News
Connecting India To New World Of Digital Energy
To Top