टाकळी ढोकेश्वरमध्ये महावितरणविरोधात संतापाचा उद्रेक; राष्ट्रवादी व लंके प्रतिष्ठानचे 'टाळेबंद' आंदोलन

Digital India
0


 पारनेर प्रतिनिधी अरुण बेलकर

वीज प्रश्नावरून पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि निलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने महावितरण कार्यालयावर गेल्या दोन तासांपासून आंदोलकांनी कार्यालयाला कुलूप ठोकून 'टाळेबंद' आंदोलन सुरू केले असून, परिसरातील वीज समस्या गंभीर झाल्याने हा पवित्रा घेण्यात आला आहे. म्हसोबा झापचे सरपंच प्रकाश गाजरे, राष्ट्रवादीचे नेते रवींद्र राजदेव आणि अमोल उगले यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू आहे. रणरणत्या उन्हात आंदोलक कार्यालयाबाहेर ठिय्या मांडून असून आंदोलनाने उग्र रूप धारण केले आहे. घटनास्थळी तालुक्याचे महावितरण अधिकारी उपस्थित असूनही अद्याप कोणताही ठोस तोडगा निघू शकलेला नाही. जोपर्यंत विजेचा प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत मागे न हटण्याचा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

Made with Love by

Digital India News
Connecting India To New World Of Digital Energy
To Top