शैक्षणिक साहित्य लोकार्पण, संगणक उद्घाटन व अनेक विकासकामांचे भूमिपूजन

Digital India
0


श्रीवर्धन :संदीप लाड

रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यात शनिवार, दि. ११ एप्रिल २०२६ रोजी वेळास आगर, बोर्ली पंचतन व अदगाव परिसरात विविध शैक्षणिक व विकासकामांचा शुभारंभ उत्साहात पार पडला. कोकण पदवीधर मतदार संघाचे आमदार निरंजन डावखरे यांच्या निधीतून श्रीवर्धन तालुक्यास प्राप्त झालेल्या शैक्षणिक साहित्याचे लोकार्पण पूजा प्रशांत शिंदे, उपसभापती पंचायत समिती श्रीवर्धन यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमांतर्गत राजिप मराठी शाळा वेळास आगर तसेच कन्या शाळा बोर्ली पंचतन येथे संगणकाचे उद्घाटन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी ही सुविधा उपयुक्त ठरणार असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. यासोबतच वेळास आगर येथील नव्या अंगणवाडी इमारतीचे भूमिपूजनही करण्यात आले.तसेच भंडारी समाज गृह परिसरापासून बांदल रिसॉर्टपर्यंत रस्ता निर्मिती कामाचे भूमिपूजनही करण्यात आले. या विकासकामांमुळे स्थानिक नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

यावेळी पूजा शिंदे उपसभापती यांनी अदगाव येथील मराठी शाळा व शासकीय दवाखान्यास भेट देऊन पाहणी केली. शाळेतील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची तसेच दवाखान्यातील सुविधांची त्यांनी सविस्तर चौकशी केली व आवश्यक त्या सूचना दिल्या.

या प्रसंगी भाजप श्रीवर्धन तालुका अध्यक्ष आशुतोष पाटील, सरचिटणीस उमेश पांडुरंग अडखले, तेज अडुळकर, सरपंच प्राची घडसे, उपाध्यक्ष सेजल पेडणेकर, भंडारी समाज अध्यक्ष रणजीत मुरकर, महिला अध्यक्षा आदिती शिरधनकर, तसेच अंगणवाडी अध्यक्षा जयश्री पाटील यांच्यासह स्नेहा मुरकर, निहा पाटील, शरवू तोंडलेकर, जयमला नाईक, पत्रकार संदेश पेडणेकर व संतोष शिलकर, नितेश तोंडलेकर, प्रदीप मुरकर आणि मोठ्या संख्येने भाजप कार्यकर्ते व महिला मंडळ उपस्थित होते.

या कार्यक्रमामुळे परिसरात विकासकामांना गती मिळणार असून नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

Made with Love by

Digital India News
Connecting India To New World Of Digital Energy
To Top