किरण कुंबीरकर प्रतिनिधी मुबई
आज दिनांक ११/०४/२०२६ रोजी श्री रवींद्र कोकणे यांनी जन्मदिवसानिमित्त वायफळ खर्च न करता कोणताही देखावा न करता सरळ साधेपणाने गरजू रुग्णांना तसेच त्यांच्या नातेवाईकांना अँकर फाउंडेशन मार्फत अन्नदान सेवा देऊन साजरा केला.
आज समाजामध्ये वाढदिवस मोठे मोठे इव्हेंट करून साजरे केले जातात, दोन ते तीन हजरांचे केक तोंडाला फासून मोठेपणा मिरवला जातो. पण अन्नाची किंमत त्यालाच कळते ज्याला अन्न मिळवण्यासाठी काबाडकष्ट करावे लागतात. ह्या सर्वाचा सारासार विचार करता अँकर फाउंडेशन या संस्थेने " देण्याचा आनंद एक आत्मिक समाधान" हा उपक्रम चालू केला आहे त्यासाठी आम्ही प्रत्येक सधन व्यक्ती ला १०० लोकांना एकवेळचे जेवण देण्यासाठी रुपये २६१७ चे सहकार्य देण्याचे आव्हान करत आहोत.
ह्या उपक्रमाअंतर्गत आपण आपल्या वाढदिवसानिमित्त किंवा इतर कार्यक्रमासाठी अँकर फाउंडेशन चे सहकार्य घेऊन आपण गरीब गरजू लोकांना अन्नदानाची सेवा देऊ शकता.या उपक्रमाबाबत अधिक माहिती हवी असल्यास, तसेच अन्नदान किंवा इतर कोणत्याही प्रकारे सहकार्य करायचे असल्यास कृपया खाली दिलेल्या तपशीलावर संपर्क करावा.
