स्वीफ्ट गाडीने घेतला अचानक पेट

Digital India
0


, प्रतिनिधी 

 पनवेल शहराजवळील गार्डन हॉटेल सिग्नल जवळ चालत्या स्वीफ्ट गाडीने अचानक पेट घेतल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली असून सुदैवाने यात कोणतीही जिवीतहानी झाली नाही.

पनवेल शहराजवळील गार्डन हॉटेल सिग्नल जवळ बुधवारी सायंकाळी एक धक्कादायक घटना घडली आहे. 2024 चे मॉडेल असलेल्या चालत्या स्वीफ्ट गाडीने अचानकपणे पेट घेतला. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली. या घटनेची माहिती परिसरातील नागरिकांनी पनवेल शहर पोलीस ठाणे तसेच अग्नीशमन दलाला देताच अग्नीशमन दलाच्या बंबांनी घटनास्थळी रवाना होवून त्यांनी सदर आग अथक परिश्रम करून आग आटोक्यात आणली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. सदर गाडी ही सीएनजी प्रकारची असल्याची माहिती मिळत आहे. सुदैवाने यात कोणतीही जिवीतहानी झाली नसल्याचे समजते.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

Made with Love by

Digital India News
Connecting India To New World Of Digital Energy
To Top