लव्ह जिहाद संशयीत आरोपीला अटक करण्यासाठी वणी पोलिस ठाण्यावर संतप्त नागरीकांचा मोर्चा

Digital India
0


वणी प्रतिनिधी:- रितेश पारख 

वणी -अल्पवयीन मुलीवर लैंगिक शोषण करुन लग्न करण्यासाठी दबाव आणत कुटुंबियांना ठार मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी दाखल गुन्ह्यात फरार असलेला संशयीत अद्यापही सापडत नसल्याने वणी शहरातील संतप्त नागरीकांनी वणी पोलिस ठाण्यावर मोर्चा काढुन कडक कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.दानीश रईस शेख याने वणी येथे अल्पवयीन मुलीवर कारमधे लैंगिक शोषण धमकी देऊन केल्यानंतर लग्न करण्यासाठी दबाव आणुन कुटुंबियांना जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी म्हसरुळ पोलिस ठाण्यात पोक्सो व बलात्काराचा गुन्हा दाखल झाला.त्या दरम्यान दानीश शेख याला वणी पोलिसातील कर्मचार्याने गुन्ह्याची माहीती देऊन फरार केल्याचा आरोप भाजप महानगर अध्यक्ष सुनिल केदार यांनी केला.सदर गुन्हा वणी पोलिस ठाण्यात हस्तांतारीत करण्यात आला वणी पोलिस व स्थानीक गुन्हे शाखा संशयीत दानीश शेख याचा शोध घेत आहेत.दरम्यान फरार संशयीत अद्यापही पोलिसाःच्या हाती लागला नसल्याने वणी नागरीक व अहीर सुवर्णकार समाज यांनी वणी पोलिस ठाण्यावर मोर्चा काढुन आरोपीला व त्याला मदत करणारांना अटक करण्याची मागणी करण्यात आली.फाशी द्या फाशी द्या आरोपीला फाशी द्या , पिडीतेला न्याय मिळालाच पाहीजे अशा घोषणा देऊन शहरातील प्रमुख मार्गावरुन निघालेल्या मोर्चात भगवे ध्वज व भगव्या टोप्या परीधान करुन जय श्री रामच्या घोषणा देत संतप्त भावना व्यक्त केल्या.व पोलिस उपअधिक्षक किरणकुमार सुर्यवंशी व सपोनी गायत्री जाधव यांना निवेदन देण्यात आले.आरोपीस अटक करुन कारवाई करावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा ईशारा देण्यात आला पोलिसांकडुन कारवाईचे आश्वासन देण्यात आले.याप्रसंगी सकल हिंदु समाज बांधव उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

Made with Love by

Digital India News
Connecting India To New World Of Digital Energy
To Top