पारनेर अरुण बेलकर
लोकनेते खासदार डॉक्टर निलेश लंके यांच्या वाढदिवसाच्या निमित्त खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या संसदीय कारकीर्दीचा 60 वर्षीय परिपूर्ती तसेच स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या स्मृती प्रित्यर्थ पारनेर ग्रामीण रुग्णालय येथे आठ मार्च व नऊ मार्च रोजी महाआरोग्य यज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे.
महाआरोग्य शिबिरामध्ये सर्व रोग तपासणी उपचार व शस्त्रक्रिया मोफत केल्या जाणार आहेत. या शिबिराचे उद्घाटन 8 मार्च रोजी सकाळी नऊ वाजता माझी आरोग्यमंत्री राजेश टोपे औ यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.यावेळी आमदार रोहित पवार, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, खासदार बजरंग सोनवणे माजी.आमदार प्राजक्त तनपुरे
आदी.मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या आरोग्य शिबिरात राज्यातील नामांकित हॉस्पिटल मधील डॉक्टर तपासणी उपचार शस्त्रक्रिया व मार्गदर्शन करणार आहेत. हृदयरोग मधुमेह रक्तदाब सांधेदुखी अपेंडिक्स हर्णिया मुळव्याध भगंदर ईसीजी मोतीबिंदू नेत्र तपासणी शस्त्रक्रिया बारा वर्षापर्यंतच्या हृदयरोग ग्रस्त बालकांचे मोफत शस्त्रक्रिया कान नाक घसा त्वचा विकार व गर्भाशय कर्करोग तपासणी दंतरोग आयुर्वेद नॅचरोपॅथी उपचार व पॅरेलेसिस रुग्णाचे पुनर्वसन यांचा समावेश आहे. या शिबिरात जास्तीत जास्त गरजू व्यक्तींनी लाभ घेण्याचे आवाहन निलेश लंके प्रतिष्ठान मावळा प्रतिष्ठान व खासदार लोकनेते निलेश लंके मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.
