माजी सभापती बाबुराव चोरगे यांच्याकडून मुस्लिम बांधवांना ईदीच्या शुभेच्छा

Digital India
0


प्रतिनिधी:संदीप लाड 

रमजान ईदचा (किंवा ईद-उल-फित्र) पवित्र सण उत्साहात साजरा होत असताना, माजी सभापती बाबुराव चोरगे यांनी सर्व मुस्लिम बांधवांना ईदीच्या आणि ईदच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेतया सणाच्या निमित्ताने समाजात शांतता, सुख आणि समृद्धी नांदो, अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे.

ईदच्या निमित्ताने कोलमांडले व बांगमांडले येथील भेटीदरम्यान बाबुराव चोरगे यांनी मुस्लिम समाजातील नागरिक आणि मित्रपरिवाराची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले. यावेळी त्यांनी ईदीच्या शुभेच्छा देत सणाचा आनंद द्विगुणित केला.

या प्रसंगी बोलताना बाबुराव चोरगे म्हणाले की, "रमजान महिना हा संयम, त्याग आणि प्रार्थनेचा महिना आहे. ईदचा हा सण केवळ आनंदाचा नसून तो एकमेकांबद्दलचा आदर आणि सामाजिक सलोखा वाढवणारा आहे. आपल्या भागातील हिंदू-मुस्लिम ऐक्य हीच आपली खरी ताकद असून, आपण सर्वजण मिळून गुण्यागोविंदाने सर्व सण साजरे करूयात."

यावेळी त्यांच्या समवेत माजी पंचायत समिती सदस्य मंगेश कोमनाक कुणबी समाजाचे तालुका उपाध्यक्ष परशुराम अडगावले कोलमांडले ग्रामपंचायत सदस्य संदीप पेंढारी आदी मान्यवर, कार्यकर्ते आणि मुस्लिम समाजातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. सर्वांनी एकमेकांना आलिंगन देऊन 'ईद मुबारक' म्हणत सणाचा आनंद साजरा केला.


Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

Made with Love by

Digital India News
Connecting India To New World Of Digital Energy
To Top