देवगाव येथे १८ वर्षीय युवकाची आत्महत्या; गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

Digital India
0



 निफाड तालुका प्रतिनिधी 

 देवगाव (ता. निफाड) येथे एका १८ वर्षीय युवकाने राहत्या घरात छतावरील पंख्याला साडीच्या साहाय्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली असून, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. 

     पोलिस पाटील सुनिल बोचरे यांनी समक्ष खबर दिली की, यातील यातील इसम राकेश गोरख पवार वय १८ वर्ष रा.इंदिरानगर देवगाव 

याने दिनांक ९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४.३०वाजेच्या सुमारास राहते घरात छतावरील फॅनला साडीचे साहाय्याने गळफास घेतला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक मोहन पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन त्यास ग्रामीण रुग्णालय लासलगाव येथे उपचाराकामी दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकारी यांनी त्यास तपासुन मयत घोषित केले. सदर घटनेची लासलगाव पोलिस ठाण्यात अ.मृ रजि नंबर ११/२०२६ भा.न्या.संहिता कायदा २०२३ चे कलम १९४ प्रमाणे नोंद करण्यात आली आहे. स.पो.नि.भास्करराव शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली पो.हवा.औदुंबर मुरडनर अधिक तपास करीत आहेत.



Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

Made with Love by

Digital India News
Connecting India To New World Of Digital Energy
To Top