जगाने महाराष्ट्राचे सामर्थ्य बघितले
60 देशांचे प्रतिनिधी समोर बसलेले. संपूर्ण जग हा संवाद ऐकत होता, पाहत होता. देवाभाऊ आले, पाहिलं आणि जिंकलं.
ज्या शहराची आजवर केवळ कल्पना केली गेली आहे ते शहर अमेरिका, युरोप, चीन, जपान या इतर कुठल्याही प्रगत देशात नाही तर भारतात आपल्या महाराष्ट्रात उभे राहत आहे. आणि देवाभाऊंच्या याच ध्येयला जगाने दाद दिली आहे.
काल दावोस मध्ये भारतीय वेळेनुसार मध्यरात्री १ वाजता टाटा ग्रुप आणि महाराष्ट्र सरकारने आयोजित केलेल्या कार्यक्रमात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तिसरी मुंबई Innovation City चे प्रारूप दाखवले. जगातील सर्वात आधुनिक तंत्रज्ञान आणि जगातील कुशल बुद्धिमत्ता एकत्र येऊन हे शहर उभे राहणार आहे. ज्या शहराचा आत्मा हा संशोधन प्रणाली असेल. जगातील अत्याधुनिक प्रवासी दळणवळण साधनांनी हे शहर जगाशी जोडलेले असेल. जिथे उपस्थित असणे ही केवळ भारतीयांसाठी नाही तर जगातील लोकांसाठीही गौरवाची बाब असेल. जसं नालंदा ही ज्ञानाची ओळख होती तसेच ही तिसरी मुंबई जगासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेची पंढरी म्हणून ओळखली जाईल.
हे शहर नेमके कसे असेल हे चित्रफितीच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांनी दाखवले आहेच, पण या कार्यक्रमादरम्यान त्यांनी मांडलेला मुद्दा अधिक भविष्यातील काळाचा आहे. १ ट्रिलियन, ३ ट्रिलियन, ५ ट्रिलियन अर्थव्यवस्थेच्या पुढे उडी मारायची असेल तर Innovation शिवाय पर्याय नाही. पारंपारिक साधनांनी १० ट्रिलियन, २० ट्रिलियन अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट साध्य होऊ शकत नाही. त्यासाठी नवीन संशोधन, नवी जलद व अचूक नाविण्य कार्यपद्धती गरजेची आहे.
थोडक्यात, जेव्हा मुख्यमंत्री पदानंतरच्या पहिल्याच अधिवेशनात देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र आता थांबणार नाही असे सांगितले होते, कालच्या या कार्यक्रमात Innovation City ची प्रात्यक्षिक मांडून महाराष्ट्राचा वेग किती असणार हे दाखवून दिले. २०२५ मध्ये दावोस मध्येच त्यांनी तिसऱ्या मुंबईची कल्पना मांडली होती. २०२६ मध्ये त्याचे प्रारूप तयार आहे आणि २०२७ मध्ये जेव्हा मी येईल तेव्हा ते शहर प्राथमिक रूपात कसे दिसते आहे हे इथे सर्वांना दाखवेल. या देवेंद्रजींच्या संभाषणानंतर जो माहोल त्या Town Hall मध्ये झाला तो महाराष्ट्राची जगात वट दाखवणारा होता.
कार्यक्रमाचे संचालन करणारे जॉन वेरनर जे जगात नाविण्यतेसाठी Super Connector मानले जातात आणि जगातील Harvard सारख्या विद्यापीठांनी ज्यांचा सन्मान केला आहे, त्यांनी उच्चारलेले शब्द संपूर्ण जगासमोर केवळ भारताचा नाही, केवळ महाराष्ट्राचा नाही, केवळ देवेंद्र फडणवीसांचा नाही तर सर्व महाराष्ट्रीयांचा सन्मान वाढवणारे होते. ते म्हणाले "चला हा क्षण रेकॉर्ड करूया. मोबाइल काढा. या माणसाला त्यांच्या Vision पूर्ण करण्यासाठी जबाबदार धरा. मला खात्री आहे की याचा लाभ फक्त या माणसाच्या मोठ्या राज्यालाच नाही, तर संपूर्ण भारताला, भारतीय उपखंडाला, पृथ्वीला, आकाशगंगेला, सौरमंडलाला आणि त्याहूनही पुढे पोहोचेल. Ladies and Gentlemen Imagination in Action."
सर्वांचे कॅमेरे देवेंद्र फडणवीस या व्यक्तीवर खिळलेले होते. महाराष्ट्रापासून ६५०० किमी दूर त्या सभागृहातील प्रत्येक व्यक्ती टाळ्यांच्या गजरात महाराष्ट्राचे आणि महाराष्ट्राच्या नेतृत्वाचे कौतुक करत होती.
दावोस मध्ये जाऊन काय केले किंवा दावोस मध्ये का हे प्रश्नाचे उत्तर इथे आहे. जगासमोर मुख्यमंत्र्यांनी न्वोन्मेषी महाराष्ट्राचे भव्य आणि दिव्य स्वरुप दाखवले. प्रत्येक देश, आर्थिक संस्था आणि गुंतवणूकदारांना महाराष्ट्राच्या दारी आणले. एका भव्य आणि नवोन्मेषी महाराष्ट्राची पायाभरणी केली.
भारत उद्या जेव्हा नेतृत्व करेल तेव्हा त्याचे Power Engine महाराष्ट्रच असेल हे देवाभाऊंनी जागतिक मंचावरून अधोरेखित केले आहे.
