प्रतिनिधी, संदीप लाड
श्रीवर्धन पोलीस ठाण्याच्या वतीने तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करत एक महत्त्वपूर्ण कामगिरी करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या CEIR (Central Equipment Identity Register) पोर्टलचा वापर करून पोलिसांनी जून महिन्यात गहाळ झालेले एकूण ०७ मौल्यवान मोबाईल फोन शोधून काढले आहेत. हे हस्तगत केलेले सर्व मोबाईल आज संबंधित मूळ तक्रारदारांना सन्मानाने परत करण्यात आले. आपले हरवलेले फोन पुन्हा मिळाल्यामुळे नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.आजकालच्या डिजिटल युगात मोबाईल ही प्रत्येकाची अत्यंत महत्त्वाची गरज बनली आहे. मोबाईल गहाळ किंवा चोरीला गेल्यास नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान होतेच, शिवाय त्यातील वैयक्तिक डेटाचा गैरवापर होण्याची भीतीही असते. हीच बाब लक्षात घेऊन श्रीवर्धन पोलिसांनी प्राप्त तक्रारींवर तातडीने कारवाई सुरू केली. सायबर सेल आणि 'सीईआयआर' पोर्टलच्या तांत्रिक मदतीने पोलिसांनी या गहाळ फोनचा माग काढला आणि ते यशस्वीरीत्या रिकव्हर केले.हे ७ मोबाईल फोन तक्रारदार यांना पोलीस ठाण्यात बोलावून पोलिस निरीक्षक सुरेंद्र गरड
यांच्या मार्गदर्शनाखाली
Cier portal पाहणारे पोलीस शिपाई 933 अक्षय अरुण पाटील व पोलीस शिपाई 1127 राहुल रंगराव तोवार यांच्यासमवेत अधिकृतपणे मूळ मालकांच्या स्वाधीन करण्यात आले. आपला गहाळ झालेला फोन परत मिळेल अशी आशा सोडून दिलेल्या नागरिकांनी श्रीवर्धन पोलिसांच्या या तत्पर आणि कौतुकास्पद कामगिरीबद्दल पोलीस प्रशासनाचे मनापासून आभार मानले आहेत
