१ मार्च रोजी डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचा स्वच्छता' अभियान शेकडो श्री सदस्य उतरले रस्त्यावर

Digital India
0


प्रतिनिधी/ संदीप लाड 


महाराष्ट्र भूषण डॉ नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंतीनिमित्त पद्मश्री डॉ. श्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या प्रेरणेने आणि डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने १ मार्च रोजी हरिहरेश्वर MTDC परिसरात सकाळी 7:30 ते 11:00 वाजेपर्यंत स्वच्छता अभियान राबविण्यात आले. 

या स्वच्छता अभियानात MTDC परिसरातील सर्व प्रमुख रस्त्यांसह गणेश घळ ह्या पर्यटन स्थळाकडे जाणारा मुख्य स्वच्छ करण्यात आला 

या मोहिमेत श्री समर्थ बैठकी मधील शेकडो श्रीसदस्य (कौटुंबिक सदस्य) स्वच्छतेचे साहित्य हातात घेऊन स्वयंस्फूर्तीने सहभागी झाले होते यामध्ये सुका कचरा 5 ते 6 टन गोळा करून त्याची विल्हेवाट लावण्यात आले

डॉ नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून दरवर्षी विविध उपक्रम राबविण्यात येतात यामध्ये रक्तदान शिबिर,आरोग्य शिबिर,वृक्षारोपण व संवर्धन,विहिरी नद्या साफसफाई,जल पुनर्भरण पाणपोई,बंधारा उपक्रम शैक्षणिक साहित्य वाटप,स्वच्छता अभियान असे अनेक समाजपयोगी उपक्रम राबविले जातात 


 ही स्वच्छता मोहीम स्वच्छ भारत अभियानाचे महाराष्ट्र राज्याचे महामहीम राज्यपालांनी नियुक्त केलेले स्वच्छता दूत डॉ नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे अध्यक्ष पद्मश्री पुरस्कार सन्मानित डॉ. श्री आप्पासाहेब धर्माधिकारी व डॉ. श्री सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले होते


Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

Made with Love by

Digital India News
Connecting India To New World Of Digital Energy
To Top