श्रीवर्धन पंचायत समितीवर पुन्हा राष्ट्रवादी अजित पवार गटाचा वरचष्मा

Digital India
0

 


खा. सुनील तटकरे मंत्री अदिती तटकरे व माजी आ. अनिकेत भाई तटकरे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे श्रीवर्धनचे निवडणूक निरिक्षक रवींद्र चाळके यांचा करिष्मा


जिल्हा परिषदेच्या २ जागांसह पंचायत समितीवर राष्ट्रवादीचे २ तर भाजपचे १ जागांवर उमेदवार विजयी

 प्रतिनिधी /संदीप लाड


रायगड जिल्हा परिषद व पंचायत समिती श्रीवर्धन सार्वत्रिक2026 निवडणुकांच्या नुकत्याच जाहीर झालेल्या निकालांमध्ये श्रीवर्धन पंचायत समितीवर राष्ट्रवादी भाजप युतीने आपले निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे. पंचायत समितीच्या ४ पैकी ३ जागांवर तर जिल्हा परिषद च्या २ जागांवर जिंकून राष्ट्रवादी भाजप युतीने विरोधी पक्षांना धोबीपछाड दिली आहे.

या विजयामुळे तालुक्याच्या स्थानिक राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद पुन्हा एकदा सिद्ध झाली असून, पक्षातील गटबाजी मोडून काढण्यात नेतृत्वाला यश आले आहे.

   

युतीचे विजयी उमेदवार 


आराठी जिल्हा परिषद गटात

१) सौ वैभवी मंगेश कोमनाक (राष्ट्रवादी अजित पवार गट विजयी

२)बोर्ली जिल्हा परिषद गटात सौ वासंती मंगेश गुणाजी (राष्ट्रवादी अजित पवार गट विजयी 


बागमांडला पंचायत समिती गणात

१)सौ अस्मिता प्रदर्शन चोरगे 

 (राष्ट्रवादी अजित पवार गट) विजयी

२) आराठी पंचायत समिती गणात सौ पूजा प्रशांत शिंदे 

(भारतीय जनता पक्ष)विजयी

३) दिघी पंचायत समिती गणात श्री सुचिन नंदाकर कीर (राष्ट्रवादी अजित पवार गट) विजयी


निकालानंतर राष्ट्रवादी व भाजप कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे फटाके फोडून आणि गुलालाची उधळण करत आनंदोत्सव साजरा केला.


या निकालामुळे विरोधी पक्षांना मोठा धक्का बसला आहे


Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

Made with Love by

Digital India News
Connecting India To New World Of Digital Energy
To Top