वणी प्रतिनिधी:- रितेश पारख
वणी (दि.१३): भारत हा तरुणांचा देश आहे. भारतातील तरुणांची मोठी संख्या ही समस्या नसून देशाची ताकद आहे. भारताच्या तरुण पिढीला रोजगार देण्याची क्षमता खाजगी क्षेत्रात आहे. या क्षेत्रात रोजगार मिळविण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची कौशल्ये विद्यार्थ्यांनी आत्मसात करून रोजगाराच्या संधी शोधता आल्या पाहिजे असे प्रतिपादन मविप्र संचालक प्रविण जाधव यांनी केले. ते मराठा विद्या प्रसारक समाजाचे कर्मवीर रावसाहेब थोरात कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात संपन्न झालेक्या रोजगार मेळाव्या प्रसंगी अध्यक्षीय मनोगतात बोलत होते. सी.आय.आय. मॉडेल करिअर सेंटर व वणी महाविद्यालय यांचे संयुक्त विद्यमाने हा रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी व्यासपीठावर मविप्र समाज संस्थेचे उपाध्यक्ष विश्वास मोरे, महाविद्यालयीन विकास समितीचे अध्यक्ष राकेश थोरात, किमान कौशल्ये समिती अध्यक्ष सतीश जाधव, सी.आय.आय.- एम,सी,सी मॅनेजर सागर शिरसाठ, दिंडोरी नगर परिषदेचे नगराध्यक्ष सुजीत मुरकुटे, वणी गावाचे सरपंच मधुकर भरसठ, प्राचार्य डॉ.एस.एस.काळे,प्रकाश देशमुख, किरण गांगुर्डे, विजय बर्डे, देवकाका गांगुर्डे, ट्रेनिंग व प्लेसमेंट ऑफिसर डॉ.वाय.आर.मोहन, डॉ.पगार सर व विविध कंपन्यांचे एच.आर. मॅनेजर उपस्थित होते.
सरस्वती पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.एस.काळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. आपल्या प्रास्ताविकातून त्यांनी ज्या उद्देशाने कर्मवीरांनी मविप्र संस्थेची स्थापना केली तो उद्देश अशा रोजगार मेळाव्यातून सफल होतो. आद्य कर्मवीर रावसाहेब थोरात यांच्या कर्मभूमीत हा रोजगार मेळावा घेताना विशेष आनंद होत आहे. खेड्यापाड्यातील ग्रामीण विद्यार्थी हा प्रामाणिक आणि कष्टाळू आहे. अशा विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी प्राप्त झाल्यास ते निश्चितच या संधीचे सोने करतील असा आशावाद डॉ. काळे यांनी व्यक्त केला. सी.आय.आय.- एम.सी.सी मॅनेजर सागर शिरसाठ यांनी रोजगार मेळाव्याचा हेतू आणि उद्देश आपल्या मनोगतातून स्पष्ट केला. या रोजगार मेळाव्यात भारतातील तीस पेक्षा अधिक नामांकित कंपन्यांनी आपला सहभाग नोंदवला. १२५० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पद्धतीने नोंदणी केली. ३७६ इतक्या विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष मुलाखती दिल्या. तर १३७ विद्यार्थ्याना रोजगार प्राप्त झाला.
कार्यक्रम प्रसंगी बाबासाहेब मोरे, रमणतात्या देशमुख, सतीश पवार, रोशनी मॅडम, ऋतुजा मॅडम, कमलेश गोसावी, चिंतामण चव्हाण, विकास दाते, राहुल पाटील, अभिषेक सर, शुभम सर, विशाखा शिंदे, साक्षी मॅडम, विवेक कोळी, सृष्टी मॅडम, शेख सर, सुनील जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वितेसाठी महाविद्यालयातील प्राध्यापक, प्रध्यापकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जे.डी.पवार व आभार डॉ.वाय.एम.साळुंके यांनी मानले.
