जादूटोण्याच्या नावाखाली फसवणूक

Digital India
0


जादूटोण्याच्या नावाखाली लोकांची फसवणूक करणाऱ्या एका भामट्याविरोधात पनवेल पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून संबंधित व्यक्तीला तात्काळ अटक करावी, अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे.

तक्रारदारांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित व्यक्ती अनेक वर्षांपासून जादू-टोणा, भूतबाधा काढणे, कौटुंबिक वाद मिटवणे, नोकरी-व्यवसायात यश मिळवून देणे अशा आमिषांवरून लोकांकडून मोठ्या प्रमाणात पैसे उकळत होता. काही कुटुंबांचे संसार त्याच्या सल्ल्यामुळे आणि भीती दाखवून केलेल्या कृत्यांमुळे उध्वस्त झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे, संबंधित भामटा व्यक्ती लोकांच्या अडचणींचा फायदा घेत मानसिक दबाव निर्माण करत असे. “घरात संकट आहे”, “कुणीतरी काळी जादू केली आहे”, “विशेष पूजा करावी लागेल” अशा कारणांवरून हजारो ते लाखो रुपयांची मागणी केली जात असल्याचे सांगण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

Made with Love by

Digital India News
Connecting India To New World Of Digital Energy
To Top