नांदेड प्रतिनि
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) मध्ये शौरभ डिगांबरराव बोदमवाड तसेच सीमा सुरक्षा दल (BSF) मध्ये गोपाल परमेश्वर आक्कमवाड यांची निवड झाल्याने मेंडका गावाचा नावलौकिक राज्य व देशपातळीवर उंचावला आहे. या ऐतिहासिक यशाबद्दल मेंडका गावात भव्य स्वागत व सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
हा गौरवपूर्ण कार्यक्रम यादव मित्र मंडळ, मेंडका येथील तरुण बांधवांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मेंडका नगरीचे सरपंच लक्ष्मणराव ईजळकर हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रभावी व प्रेरणादायी सूत्रसंचालन परशुराम आक्कमवाड सर यांनी केले.
यावेळी मार्गदर्शन करताना परशुराम आक्कमवाड सर म्हणाले,
“विद्यार्थी जीवनात ग्रंथ, कादंबऱ्या व महापुरुषांचे जिवन चरीत्र आणि प्रेरणादायी साहित्याचे नियमित वाचन केले पाहिजे. वाचनामुळे विचारप्रक्रिया प्रगल्भ होते व यशाचा मार्ग अधिक सुलभ होतो.”
कार्यक्रमात एस.आर.पी.एफ. संभाजीनगर येथील पोलीस ज्ञानेश्वर जंगीलवाड, नांदेड पोलीस शंकर बक्केवाड, तसेच शंकर पामलवाड सर यांनी आपले मनोगत व्यक्त करत निवड झालेल्या जवानांचे अभिनंदन केले व त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी दिगांबर दासरे सर यांनीही प्रेरणादायी विचार मांडून युवकांना देशसेवेचे महत्व पटवून दिले.
कार्यक्रमाच्या शेवटी माजी सरपंच शिवचरण पारडकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. या प्रसंगी मेंडका गावातील सर्व समाज बांधव मित्रपरिवार, नातेवाईक, मान्यवर व ग्रामस्थ बालाजी नागलवाड, महाजन बक्केवाड, शेख शेबीर, व्यंकटी आक्कमवाड, बळीराम अक्कमवाड, नवनाथ जंगिलवाड, गंगाधर दासरे, तुकाराम मनुरे, अंबादास अक्कमवाड, दत्ता अनमवाड, उत्तम जनजवळे, तुळशीराम चुकेवाड, रमेश सुदेवाड, गणपत लाडमाड, मारुती आक्कमवाड, देविदास आकमवाड, गोपाल बक्केवाड, आकाश घोसले, हनुमान जंगीलवाड, सतीश अक्कमवाड, गुणाजी अकामवाड, रमेश पाटील वसुरे, गोविंदराव अनमवाड, अंकुश जंगीलवाड, चंद्रकांत आकमवाड, सूर्यकांत जगीलवाड, दिगंबर अक्कमवाड, मोठ्या संख्येने उपस्थित होते.
CISF व BSF सारख्या देशाच्या सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाच्या दलांमध्ये मेंडका गावातील युवकांची निवड होणे ही संपूर्ण गावासाठी अभिमानाची बाब असून तरुण पिढीसाठी हा प्रेरणादायी आदर्श ठरत आहे. विशेष म्हणजे, मेंडका नगरीतील एक हजारांहून अधिक शासकीय कर्मचारी विविध विभागांत कार्यरत असून हे गाव शैक्षणिक, सामाजिक व प्रशासकीय क्षेत्रातही आपली वेगळी ओळख निर्माण करत आहे
