पत्रकार
नागपूर:- राज्याचे हिवाळी अधिवेशन सध्या नागपुरमध्ये सुरु आहे. या हिवाळी अधिवेशनात राज्यातील महिला सुरक्षेवरुन सत्ताधारी विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळत आहे. आज विधानसभेच्या कामकाजात फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयात काम करणाऱ्या डॉ. तरुणीचे आत्महत्या प्रकरण चांगलेच चर्चेत आले. या डॉक्टर तरुणीने आत्महत्या केल्याचा २:१५ फडणवीस यांनी महत्त्वाचा खुलासा केला आहे.
फलटणमध्ये एका महिला डाक्टर मृत्यू झाला. या घटनेच्या तपासासाठी एसआयटी तसेच न्यायालयाची चौकशी नेमली. आत्तापर्यंतच्या रिपोर्टनुसार, डॉक्टर तरुणीच्या हातावर जी सुसाईड नोट लिहीली होती, ते अक्षर तिचेच असल्याचे फॉरेन्सिक तपासात स्पष्ट झाले आहे. पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदणे याने तिची फसवणूक करुन शारिरिक शोषण केल्याचं समोर येत आहे. तरुणी ही मेडिकल ऑफिसर होती. तरुणीने काही आरोपींना अनफिट दाखवले होते. याबाबत पोलिसांनी तिच्या विरोधात पत्र दिले. हे सगळे पाच महिने आधी घडले.
एकीकडे बदणेने केलेली फसवणूक तसेच दुसऱ्या आरोपीनेही तिची फसवणूक केली, याच त्रासामुळे तरुणीने आत्महत्या केली. तरुणीने गळफास घेत आयुष्य संपवले, तिचा गळा दाबलेला नाही म्हणजेच हत्या नाही. याबाबतचा अधिक तपासही सुरु आहे. तरुणीचे वॉट्सऍप चॅट तसंच इतर पुरावे मिळवले जात आहे. सीसीटीव्ही फुटेजही ताब्यात घेण्यात आले. साठ दिवसात चार्जशीट दाखल केले जाते. तपास सुरू समोर सगळं येईल. याप्रकरणाशी कसलाही संबंध नसलेल्यांचे यामध्ये नाव घेतले गेले. प्रत्येक गोष्टीत राजकारण आणण्याची ही पद्धत चुकीची आहे, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी याप्रकरणात कोणतेही राजकीय कनेक्शन नसल्याचे स्पष्ट केले आहे.
